जळगावात सहकार विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:20 PM2018-12-02T12:20:30+5:302018-12-02T12:20:52+5:30
ठेवीदार हितरक्षक ठेवीदार संघटनेचे सहकार मंत्र्यांना निवेदन
जळगाव : जिल्ह्यातील १६ हजार ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी सहकार विभाग झोपेचे सोंग घेत आहे, अशी तक्रार ठेवीदार हितरक्षक ठेवीदार संघटनेच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली.
या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठेवीदारांना न्याय देण्याासाठी सहकार विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुकाराम मुंडे यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करावी.
जळगाव जिल्ह्यातीलच गुलाबराव पाटील हे सहकार राज्यमंत्री असतानादेखील त्यांनी न्याय दिला नसल्याचे गुलाबराव पाटील यांच्यासमोरच ठेवीदारांनी देशमुख यांना सांगितले. निवेदन देताना दिलीप सुरवाडे, सुधाकर पाटील, सरला नारखेडे, नामदेव भोळे, सोपान चौधरी, लीना कोळंबे, सुशीला नारखेडे, ललित नेहेते, रजनी भोळे, नथ्थू नारखेडे, कविता कोळंबे आदी उपस्थित होते.