चैत्र नवरात्रोत्सवात केळीला मागणी मोठी, भाव मात्र नगण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:17 PM2019-04-06T17:17:09+5:302019-04-06T17:18:07+5:30
चिनावल परिसर : बोर्डावरचे भाव ठरताय शोभेचे आकडे
चिनावल, ता.रावेर : संपूर्ण रावेर तालुक्यात केळी पट्ट्यात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर केळी माल बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार आहे. सद्य:स्थितीत गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे. विशेष करून उत्तर भारतात या नवरात्रोत्सवात केळीला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे परंतु केळीचे आगार समजल्या जाणाऱ्या संपूर्ण भारतातील जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मात्र मागणीनुसार भाव मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
दररोज उत्तर भारतासह स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणावर दररोज केळी माल घेऊन रवानगी करताना दिसत आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती काढत असलेल्या केळी भावाला व्यापारी केराची टोपली दाखवत आहे. बोर्डापेक्षा कमी भावाने चांगल्या प्रतीचा माल मागणी करीत असल्याने केळी उत्पादक त्रस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर खर्च करून चांगल्या प्रतीचा माल तयार होण्यासाठी कर्जाऊ पैसे वसूल करून केळी कापणीपर्यंत शेतकरी राबराब राबतो. मात्र केळी कापणीची वेळ आल्यावर व्यापारी मालात दोष काढून हा माल याच भावात द्याल तर घेऊ, असा पवित्रा अवलंबत असल्याने व केळी पिक नाशवंत असल्याने उत्पादकांकडे काही इलाज नसतो. याचा गैरफायदा व्यापारी घेत असून व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणाºया कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र व्यापाऱ्यांविरोधात एक शब्दही काढायला तयार नाही. आधीच केळी पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असताना दुसरीकडे ज्या केळीच्या भरवशावर शेतकºयांनी आपल्या भविष्यातील विविध नियोजन केले होते तेही कोलमडल्याने उत्पादक त्रस्त झाले आहे.
देशाच्या सर्व ठिकाणी बºयापैकी भावही आहे, मग शेतकºयांना द्यायला का भाव नाही, हा मोठा गंभीर प्रश्न उत्पादकांसमोर आहे. अजून बºयाच मोठ्या प्रमाणावर केळी बागा कापणीवर यायच्या आहेत. त्याच्या आधी असे प्रकार अनुभवास येत असल्याने शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. सद्य:स्थितीत केळीला फरक धरून हजारापेक्षा जास्त भाव आह.े मात्र व्यापारी केळी कापण्यासाठी मळ्यात पोहोचल्यावर हा माल चांगल्या प्रतिचा नाही, अशी विविध कारणे सांगून तेथून परत जातो. यामुळे शेतकºयांनाही नाईलाजाने माल द्यावा लागतो. अजून केळी कापण्याला सुरुवात झाली आहे. चांगल्या प्रतीचा माल सर्वात कमी भागांमध्ये आहे तरीसुद्धा केळी पट्ट्यात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी त्रासले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन विभागाने फक्त ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनीच खरेदी करावे, अशा सक्त सूचना द्याव्यात. तसेच बिगर परवानाधारक व्यापाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे.