वनाधिकार समितीवर लादलेले काम रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:16 AM2021-02-12T04:16:33+5:302021-02-12T04:16:33+5:30
जळगाव : उप अधीक्षक ,भूमी अभिलेख चोपडा यांनी वनाधिकार समिती यांना चुना,बाबू, मंजूर पुरवणे तसेच मोजमाप करण्यासाठी दगडी चिरा ...
जळगाव : उप अधीक्षक ,भूमी अभिलेख चोपडा यांनी वनाधिकार समिती यांना चुना,बाबू, मंजूर पुरवणे तसेच मोजमाप करण्यासाठी दगडी चिरा गाडणे व सीमांकन करणे, हे काम वनाधिकार समितीला करण्याचे लेखी पत्र काढले आहे. हा वनाधिकार समितीवर पूर्ण अन्याय आहे, हे काम भुमि अभिलेख विभागाकडे द्यावे, अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाने केली आहे.
वनाधिकार समितीकडे कुठलाही निधी आणि मनुष्य बळ उपलब्ध नसताना व भूमिअभिलेख विभागाला ह्या साठी पुरेसा निधी मिळत असताना ते वनाधिकार समितीला सांगितले जात आहे. तसेच भूमिअभिलेख, चोपडा यांना मिळालेल्या निधीचा पुर्ण वापर करण्याचे आदेश द्यावे. आणि संबंधित वनाधिकार समितीला पत्र द्यावे, अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, ताराचंद बारेला, नारायण बारेला, गेमा बारेला, प्रदीप बारेला, प्रमोद बारेला, धर्मा बारेला यांनी केली आहे.