साफसफाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:14+5:302021-05-31T04:14:14+5:30
विजेचा लपंडाव जळगाव : सध्या भारनियमन नसले, तरी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने, शहरवासीय त्रस्त झाले आहे. रुक्मिणीनगर, जिजाऊनगर, ...
विजेचा लपंडाव
जळगाव : सध्या भारनियमन नसले, तरी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने, शहरवासीय त्रस्त झाले आहे. रुक्मिणीनगर, जिजाऊनगर, वाघ नगर या भागात रविवारी अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रहिवासी उकाड्याने त्रस्त झाले.
खड्डे बुजविण्याची मागणी
जळगाव : पावसाळा सुरुवात होण्यास अद्याप वेळ असला, तरी शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वाघनगर व जिजाऊनगर भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
आज लसीकरणासाठी कूपन वाटप
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथील लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी सकाळी कूपन वाटप केले जाणार असून, लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पथदिवे बंद
जळगाव : रामानंदनगर थांबा ते थेट जिजाऊनगरपर्यंतचे पथदिवे अनेक वेळा बंद राहत असल्याने, या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून ही समस्या अधिकच जाणवत असून, दोन-तीन दिवसाआड पथदिवे बंद असतात. हे पथदिवे नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.