भडगाव शहरातील नाले सफाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:29+5:302021-06-01T04:12:29+5:30
शहरातून जाणारा कोल्हे नाला ग्रीन पार्क काॅलनी भाग, आदर्श कन्या शाळा भाग, न्यायालयाच्या इमारतीमागून मेनरोड बाजारपेठ भागातून स्मशानभूमी, ...
शहरातून जाणारा कोल्हे नाला ग्रीन पार्क काॅलनी भाग, आदर्श कन्या शाळा भाग, न्यायालयाच्या इमारतीमागून मेनरोड बाजारपेठ भागातून स्मशानभूमी, गिरणा नदीकडे जातो. या नाल्यात शहरातील गटारींचेही पाणी वाहते. या नाल्याचे पाणी गिरणा नदीत जाते. दरवर्षी नगरपरिषदेमार्फत हा नाला जेसीबी मशीनने झाडे-झुडपे तोडून, साचलेला गाळ काढून स्वच्छ करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात रोगराई न होता पावसाचे पाणी वाहण्यास सोयीचे ठरते. घाण न साचल्याने नाल्यातील पाणी सरळ वाहून जाते. त्यामुळे तात्काळ कोल्हे नाल्यातील काटेरी झाडे-झुडपे तोडून जेसीबी मशीनने गाळ काढून नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यात कोल्हे नाल्याच्या पाण्यात अडथळा न ठरता पुराचे पाणी वाहण्यास सोयीचे ठरेल. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व कोल्हे नाला सफाईचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
===Photopath===
310521\31jal_1_31052021_12.jpg
===Caption===
भडगाव शहरातील नाला सफाईची मागणी