भडगाव तालुक्यातील फळपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 09:13 PM2020-01-04T21:13:21+5:302020-01-04T21:13:43+5:30
भडगाव : तालुक्यात जूनमध्ये रोजी चक्रीवादळाने १७ गावांतील केळी, लिंबू, मोसंबी, डाळींब आदी फळ पिकांचे नुकसान झाले. तालुका प्रशासनाने ...
भडगाव : तालुक्यात जूनमध्ये रोजी चक्रीवादळाने १७ गावांतील केळी, लिंबू, मोसंबी, डाळींब आदी फळ पिकांचे नुकसान झाले. तालुका प्रशासनाने ५६७.८६ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे केले होते. मात्र अनुदानाची रक्कम शेतकरी वर्गाला मिळालेली नाही.
शासनाकडे एकुण ७९ लाख ५८ हजार ३४० रुपये अनुदानाची रकमेची मागणी तहसिल प्रशासनाने केली होती. तालुक्यातील बोदर्डे, पांढरद यासह १७ गावातील शेतकरी अुदानाची मागणी करीत आहेत.
एकुण ८५२ नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पिक नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविला. त्यानुसार संबंधित शेतक-यांना नुकसान भरपाई अनुदानाचा तत्काळ लाभ लोकप्रतिनिधींनी मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.