कुसुंबा गावात समांतर रस्ता बनवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:11+5:302021-03-10T04:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव ते फर्दापूर या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यात कुसुंबा गावातील दत्त मंदिर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव ते फर्दापूर या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यात कुसुंबा गावातील दत्त मंदिर चौक ते पाण्याची टाकी या मार्गावर समांतर रस्ता बनवून देण्याची मागणी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जालना पीडब्लुडीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. त्यासाठी त्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ‘कुसुंबा गावातील हा सर्वात वापराचा रस्ता आहे. आणि हे गाव सात ते आठ हजार लोकवस्तीचे आहे. त्यावरून सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असते. हा महामार्ग बंद असताना ही सर्व वाहतूक याच रस्त्यावरून सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करून देण्याची मागणी होत आहे.’
यावेळी काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष धनराज जाधव, मनोज परदेशी, प्रमोद घुगे, रविंद्र कोळी, भरत महाजन, दयाराम पाटील, भरत पाटील, सुरेश पाटील, सुधाकर पाटील उपस्थित होते.