रेमडेसिविरचे दर नियंत्रण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:10+5:302021-04-28T04:18:10+5:30
केवळ कर्मचाऱ्यांना प्रवेश जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गेट क्रमांक दोनमधून आता केवळ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश द्यावा, ...
केवळ कर्मचाऱ्यांना प्रवेश
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गेट क्रमांक दोनमधून आता केवळ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश द्यावा, अशा सूचना सुरक्षारक्षकांना देण्यात आल्या आहेत. नातेवाइकांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे गेट सायंकाळी बंद करण्यात आले होते.
पांडे चौकात तपासणी
जळगाव : पांडे चौकात पोलिसांकडून सायंकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केली जात होते. नेरी नाका परिसरात केवळ चारचाकी थांबवून विचारपूस केली जात होती. अनेकांना विनाकारण फिरत असल्याचे समोर आल्यानंतर फटकारले जात होते. मात्र, अनेक दुचाकीस्वार निघून जात होते.
तहसील परिसरात शुकशुकाट
जळगाव : लॉकडाऊनचा परिणाम म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारातील स्टॅम्प वेंडरही येत नसल्याने या परिसरात मंगळवारी शुकशुकाट होता. अनेकांना कामे होत नसल्याने परतावे लागत असल्याचे चित्र होते. एरवी या ठिकाणी मोठी गजबज असते.