नगरसेवकांच्या वकीलांनी मागितली मुदत

By admin | Published: February 23, 2017 12:53 AM2017-02-23T00:53:42+5:302017-02-23T00:53:42+5:30

घरकुल नुकसान प्रकरण : २३ मार्चला होणार पुढील सुनावणी

Demand for the councilor's solicitors | नगरसेवकांच्या वकीलांनी मागितली मुदत

नगरसेवकांच्या वकीलांनी मागितली मुदत

Next

जळगाव : खंडपीठाच्या आदेशानुसार घरकुल घोटाळा व मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी नगरसेवकांकडून मनपाचे झालेले नुकसान वसुली करण्याबाबतच्या सुनावणीला बुधवारी सुरवात झाली़ यात १२ आजी-माजी नगरसेवकांना बोलाविण्यात आले होते़ खुलासे व बाजू मांडण्यासाठी मुदत मिळावी, यासाठी त्यांच्या वतीने वकीलांनी वेळ मागितली़ त्यानुसार मुदत देण्यात आली असून २२ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे़
घरकुल व मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी ४८ नगरसेवकांकडून घरकुलची सुमारे १ कोटी १६ लाखाची आणि मोफत बससेवेची ४८ नगरसेवकांकडून ५ लाख १४ हजार वसुली करण्याबाबत आयुक्तांनी सुनावणी घ्यावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार घरकुल घोटाळ्यातील आजी माजी नगरसेवकांच्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी १२ आजी- माजी नगरसेवकांची सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते़ आयुक्त जीवन सोनवणे यांच्या दालनात सकाळी १०  ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुनावणीची प्रक्रिया चालली. सर्व नगरसेवकांचे वकीलपत्र अ‍ॅड. डी. एच. परांजपे यांनी घेतले. याप्रकरणात खुलासा तसेच आपली बाजू मांडण्यासाठी वकीलांनी २२ मार्चपर्यंतचा मुदत मागितली. त्यानुसार आयुक्तांनी २२ मार्चला बाजू मांडण्याची अनुमती दिली आहे. याप्रसंगी लेखा परीक्षक डी.आर. पाटील, लेखा परीक्षण विभागाचे अनिल बिºहाडे, रवींद्र कदम आदी उपस्थित होते.
आजी-माजी नगरसेवक हजर
अफजल खान रऊफ खान पटवे, शिवचरण ढंढोरे, अशोक काशिनाथ सपकाळे, मंजुळा धर्मेंद्र कदम, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, डिंगबर दौलत वाणी, पुष्पा प्रकाश पाटील, देविदास धांडे, शांताराम सपकाळे, इकबालोद्दीन जीयोद्दीन पिरजादे हे स्वत: हजर होते. यात प्रदिप रायसोनी व महेंद्र तंगू सपकाळे हे गैरहजर होते़ रायसोनी यांच्यातर्फे गोंविद वानखेडे तर सपकाळे यांच्यातर्फे अ‍ॅड. डी. एच. परांजपे हे उपस्थित होते.

आज या आजी माजी नगरसेवकांची सुनावणी
घरकुल घोटाळा नुकसान भरपाईप्रकरणी १६ रोजी सुभद्राबाई सुरेश नाईक, वासुदेव परशुराम सोनवणे, अलका अरविंद राणे, विजय रामदास वाणी, चंद्रकांत उर्फ आबा शंकर कापसे, विद्यमान आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, सरस्वती रामदास कोळी, चुडामण शंकर पाटील, अजय राम जाधव, अशोक रामदास परदेशी, कैलास  सोनवणे, डिगंबर पाटील यांना सुनावणीची नोटीस आहे.


त्रयस्त अर्जदारही मांडणार म्हणणे
सुनावणीदरम्यान म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी त्रयस्त अर्जदार दिपककुमार गुप्ता यांनी आयुक्तांना परवानगीसाठी अर्ज दिला होता़ तो अर्ज आयुक्तांना मंजूर केला आहे़ २२ मार्च रोजी सुनावणीदरम्यान त्रयस्त अर्जदारही उपस्थित राहणार असून त्याला आपले म्हणणे मांडता येणार आहे़

वकीलांनी सुनावणीवर घेतला आक्षेप
सर्व आजी-माजी नगरसेवकांचे वकीलपत्र अ‍ॅड़ डी़एच़परांजपे यांनी घेतले आहे़ त्यानुसार बुधवारी अ‍ॅड़परांजपे यांनी सुनावणीचे घेण्याचे विभागीय आयुक्तांनाच अधिकार असल्याचे सांगत सुनावणीवर आक्षेप घेतला़ मात्र आयुक्तांनी खंडपीठाचे आदेश असल्याचे अ‍ॅड़ परांजपे यांना स्पष्ट केले़

Web Title: Demand for the councilor's solicitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.