ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:37+5:302021-09-26T04:18:37+5:30
या निवेदनात पावसाच्या अवेळी व कमी-जास्त वर्षावामुळे परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सुरुवातीच्या काळात पाऊस लांबल्याने उडीद, ...
या निवेदनात पावसाच्या अवेळी व कमी-जास्त वर्षावामुळे परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सुरुवातीच्या काळात पाऊस लांबल्याने उडीद, मूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे कापूस या नगदी पिकाला फटका बसल्यामुळे शेतकरी अत्यंत वाईट आर्थिक संकटात सापडला असल्याचे म्हटले असून, पाचोरा, भडगाव या दोन्ही तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. धान्य व कडधान्य यांना हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या सर्व मालाची खरेदी शासनाने करावी, पीक आणेवारी पन्नास पैशांच्या आत करावी, प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.