लोकशाही दिनी नोंदविलेल्या तक्रारींची दखल घेत ठेवी मिळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:24+5:302021-07-07T04:19:24+5:30
जळगाव : जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये असलेल्या ठेवी ठेवीदारांना परत मिळावी, अशी मागणी सातत्याने लोकशाही दिनी करूनदेखील त्या मिळत ...
जळगाव : जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये असलेल्या ठेवी ठेवीदारांना परत मिळावी, अशी मागणी सातत्याने लोकशाही दिनी करूनदेखील त्या मिळत नसल्याने तक्रारींची दखल घेतली जावी व ठेवीदारांना न्याय द्यावा, अशी मागणी खान्देश ठेवीदार कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००८ पासून याविषयी लोकशाही दिनात तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ २० टक्के तक्रारदारांनाच उत्तर मिळाले. तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने यावर सुनावणी ठेवण्याची मागणी करीत पतसंस्थांची होणारी वसुली व परत मिळणाऱ्या ठेवी यांचा आढावा घ्यावा, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी ठेवीदारांना पत मिळाव्या, अशी मागणी समितीने केली आहे. निवेदनावर प्रवीणसिंग पाटील यांची स्वाक्षरी आहे.