डेंग्यूमुळे वाढली ड्रॅगन फ्रुटला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:55+5:302021-09-02T04:33:55+5:30
जळगाव : कोरोनानंतर आता डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने सध्या ड्रॅगन फ्रुटला मागणी वाढली आहे. मागणी वाढली तरी जळगावात या ...
जळगाव : कोरोनानंतर आता डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने सध्या ड्रॅगन फ्रुटला मागणी वाढली आहे. मागणी वाढली तरी जळगावात या फळाचे भाव स्थिर आहेत. ड्रॅगन फ्रुटमुळे प्लेटलेट वाढण्यास मदत होते, त्यामुळे या फळाकडे कल वाढला आहे. या सोबतच किवी फळालादेखील चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे दर
ड्रॅगन फ्रुट पांढरे - ६० रुपये प्रति नग
ड्रॅगन फ्रुट लाल - ८० रुपये प्रति नग
किवी - ८० रुपये (तीन नग)
डाळींब - १२० ते १४० प्रति किलो
सफरचंद - १०० ते १२० प्रति किलो
संत्रा - १०० प्रति किलो
मोसंबी ४० ते ५० प्रति किलो
चिकू - ६० ते ८० प्रति किलो
पपई - ३० ते ४० प्रति किलो
पेरू - १०० प्रति किलो
सफरचंदची वाढणार आवक
- सध्या सफरचंदचे भाव पूर्वीपेक्षा कमी आहे. आता त्याची आवक अजून वाढणार असून त्यामुळे हे भाव आणखी कमी होऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
- हिमाचल प्रदेशातील सफरचंदला अधिक पसंती असते, सध्या तेथील सफरचंद येत आहे. मात्र येत्या काही दिवसात ही आवक अजून वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील प्लेटलेट कमी होतात. यामुळे रुग्णाची प्रकृती अधिकच खालावते. यासाठी रक्तपेढ्यांकडे प्लेटलेटची मागणी वाढते. या सोबतच फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: ड्रॅगन फ्रूटमुळे प्लेटलेट वाढीसाठी अधिक मदत होत असल्याने त्याची मागणी बाजारात वाढली आहे. पूर्वीपेक्षा दीडपटीने याची विक्री वाढल्याचे सांगण्यात आले.
व्यापारी म्हणतात
डेंग्यूमुळे सध्या ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी सध्या या फळाचे भाव स्थिर आहे. ड्रॅगन फ्रूटसोबतच किवीलादेखील मागणी आहे.
- ईच्छाराम जोशी, फळ व्यापारी.