शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:02 PM2018-11-30T17:02:09+5:302018-11-30T17:03:02+5:30

सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यासाठी पुन्हा एकदा ‘महाडीबीटी’चे नवीन पोर्टल सुरू आहे. मात्र ते धीम्या गतीने काम करत आहे. अर्जाची मुदत कमी असल्याने अर्ज करण्यासाठी गर्दी होऊन वेबसाइट वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे कागदपत्र अपलोड करताना अडचणी येत आहेत. अर्ज करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Demand for extension of scholarship online application form | शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी

शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी

Next
ठळक मुद्देचौदापेक्षा अधिक शिष्यवृत्ती योजनाविद्यार्थ्यांसह पालक पडताहेत संभ्रमात

भुसावळ, जि.जळगाव : सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यासाठी पुन्हा एकदा ‘महाडीबीटी’चे नवीन पोर्टल सुरू आहे. मात्र ते धीम्या गतीने काम करत आहे. अर्जाची मुदत कमी असल्याने अर्ज करण्यासाठी गर्दी होऊन वेबसाइट वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे कागदपत्र अपलोड करताना अडचणी येत आहेत. अर्ज करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी प्रा.धीरज पाटील यांनी सर्व संबंधितांकडे निवेदन सादर केले आहे.

अर्जदार शिष्यवृत्तीसाठी निर्धारित अटी लागू व पूर्ण करण्यासाठी पात्र आहे, याची खात्री करण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल. त्याची पात्रता कोणत्याही पातळीवर अवैध आढळली तर त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करण्याची पद्धत आॅनलाईनच आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. आयटीआयचा अर्ज दाखल करताना मागासवर्गीयांचेच अर्ज भरले जात असून प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे परंतु काही अभ्यासक्रमांना तीनही वर्षाच्या निकालाच्या प्रती अपलोड करायच्या आहेत. २५६ केबी साईजपेक्षा जास्त फोटो अपलोड होत नाहीत ही समस्या आहे.
यातील काही राज्य तर काही केंद्र सरकारच्या आहेत. शिष्यवृत्तीसाठी राज्याची ‘महाईस्कॉल’ नावाची वेबसाइट होती. ती बंद करून ‘महाडीबीटी’ या पोर्टलच्या माध्यमातूनच शिष्यवृत्तींसाठी अर्ज केले जात आहेत. पूर्वी करण्यासाठीची मुदत डिसेंबरपर्यंत असायची. मात्र आता ती कमी करण्यात आली. यामुळे अर्ज करणाऱ्यांची गर्दी होऊन वेबसाइट मंद गतीने काम करत असल्याची विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी ेपोर्टल आहे. त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत वितरित शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवरून आॅनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली असून, ही मुदत कमी आहे.
परीक्षेचा काळ असल्यामुळे मुलांना अभ्यासाचा वेळ हा अर्ज करण्यासाठी खर्ची करावा लागत आहे. त्यामुळे अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवावी. शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठीही सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावा, अशी मागणी आहे.
मागील वर्षी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनांसह विविध कामांसाठी सुरू करण्यात आलेले महाडीबीटी पोर्टल अकार्यक्षम ठरल्यामुळे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुन्हा एकदा महा ई-स्कॉल पोर्टलच्या सहाय्याने शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता असा प्रकार परत यावेळेस घडू नये यासाठी उपाय योजना कराव्यात. जबाबदार अधिकारी वर्गाकडून चूक झाल्यास त्यांना त्वरित निलंबित करावे, तरी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
चौदापेक्षा अधिक शिष्यवृत्ती योजना
१) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क २) डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता ३) शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती ४) गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी ५) शासकीय विद्यानिकेतन ६) एकलव्य आर्थिक सहाय्य ७) गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (कनिष्ठ स्तर) ८) गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (वरिष्ठ स्तर) ९) शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती १०) शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती ११) जवाहरलाल नहरू विद्यापीठ १२) माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य १३) स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य १४) शासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

Web Title: Demand for extension of scholarship online application form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.