कायमस्वरुपी कृषी सहाय्यक देण्याची शहापूरच्या शेतकर्यांची मागणी
By admin | Published: April 20, 2015 01:40 AM2015-04-20T01:40:58+5:302015-04-20T13:06:41+5:30
कायमस्वरुपी कृषी सहाय्यक नसल्याने शेतकर्यांना कामकाजासाठी अडचणी येत असून कायमस्वरुपी कृषी सहाय्याक देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत
शहापूर, ता.जामनेर : कायमस्वरुपी कृषी सहाय्यक नसल्याने शेतकर्यांना कामकाजासाठी अडचणी येत असून कायमस्वरुपी कृषी सहाय्याक देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
येथील कृषी सहाय्यक प्रदीप शेकोकार यांची तीन वर्षापूर्वी बदली झाली असून त्याचा पदभार जामनेर मंडल एकचे नामदेव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्या मंडळमध्ये नऊ गावाचा समाविष्ठ असून त्यांचे या परिसराकडे दुर्लक्ष होते. कामकाजासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधल्यास मी माझ्या मंडळमध्ये असल्याचे त्यांचेकडून सांगण्यात येते. शेतकर्यांना कामकाजासाठी व नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्यांना जामनेरला कार्यालयात फेर्या माराव्या लागतात. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांचे या विषयाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
फरकांडे ग्रा.पं. सरपंच आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी इच्छुकांना लागले डोहाळे
फरकांडे, ता.एरंडोल : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी (महिला व पुरुष) निघाल्याने इच्छुकांना डोहाळे लागल्याने राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. मतदारांशी संपर्क वाढवून भावी उमेदवार वातावरण निर्मिती करू लागले आहेत.
येथील पंचायतीची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने हवसे, नवसे, गवसे यांची राजकीय आमिषे देणे सुरू झाल्याने मतदारराजांचे करमणूक व चाचपणी देखील सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुकीत कोण जिंकले कोण हरले? कसे हरले? कसे जिंकले? याचा तुलनात्मक बाजूचा अभ्यास भावी उमेदवारांनी लक्षात घ्यावा, असा संदेश मतदारांनी दिलेला आहे. कोणाचा पाठिंबा घ्यावा व कुणाला बाजूला टाकावे हे सूत्र भावी राजकारण करणार्यांनी लक्षात ठेवले तर चित्र वेगळेच पाहावयास मिळेल अशी लोकचर्चा सध्या गावात सुरू आहे. एवढे नक्की. (वार्ताहर)