मागणी घटलेल्या खोबऱ्याला ‘सोनपावले’ पावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:31 PM2019-09-05T13:31:13+5:302019-09-05T13:32:47+5:30
गौरी-गणपतीसाठी ५० टन खोबºयाचा प्रसाद
जळगाव : पावसाळी वातावरणामुळे मागणी घटलेल्या खोबºयाला गौरी-गणपती उत्सवामुळे पुन्हा मागणी वाढली असून या उत्सव काळात खोबºयाची दुप्पट विक्री झाली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीपासून दर महिन्याला केवळ २० ते २५ टन विक्री होणाºया खोबºयाची गौरी-गणपती काळातील विक्री ५० टनावर पोहचली आहे.
मसाल्यामध्ये वापर होणाºया खोबºयाला तशी वर्षभर मागणी असते. त्यामुळे जळगावातील खड्या मसाल्यासोबतच खोबºयाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र पावसाळ््याच्या सुरुवातीपासून खोबºयाची मागणी घटते. या दिवसात ओलाव्यामुळे खोबºयाला बुरशी येऊन ते खराब होते, त्यामुळे आवश्यक तेवढ्याच मालाची खरेदी ग्राहक करीत असतो. सोबतच विक्रेतेही मालाचा साठा कमी ठेवतात.
त्यानुसार यंदाही ही मागणी पावसाळ््याच्या सुरुवातीपासून कमी झाली होती. त्यात गेल्या वर्षीचे जादा भाव पाहता यंदा भाव कमी होणाच्या आशेने मागणी आणखी घटली. ज्या ठिकाणी ५० गोणी खोबरे व्यापारी घेत होते ते आता केवळ १० गोणीच खोबरे खरेदी करीत होते.
उत्सवाचे वेध लागताच मागणी वाढली
पावसाळी वातावरण असले तरी या दिवसात येणाºया गौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढली. या उत्सवासाठी विक्रेत्यांनी वाढीव मागणी करीत खोबºयाचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवला. केरळमधील बडागरा येथून सर्वात जास्त खोबºयाची आवक जळगावात होते. त्या सोबतच कोचीन भागातूनही खोबरे येते. नेहमीप्रमाणे ही आवक सुरू असताना पावसाळ््याच्या सुरुवातीपासून ती कमी झाली. दर महिन्याला केवळ २० ते २५ टन खोबरे जळगावात येऊ लागले. मात्र गणपतीसाठी ‘खिरापत’ अर्थात खोबरे, साखर, सुकामेवा यांच्यापासून तयार होणाºया प्रसादासाठी खोबºयाची आवश्यकता असतेच, सोबतच गौरींच्या स्थापनेत खोबऱ्यांच्या वाट्यांचा वापर होतो तसेच ओटी भरण्यासाठीही खोबरे लागतेच. त्यामुळे या सणांच्या काळात मागणी दुप्पटवर पोहचून या उत्सवासाठी ५ ट्रक खोबºयाची विक्री झाली.
आवक चांगली
गेल्या वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खोबºयाची आवक घटून भावही वाढले होते. मात्र यंदा केरळात पावसाचा फटका न बसल्याने खोबºयाची आवक चांगली होऊन भावही कमी झाले आहे. त्यामुळे भक्तांनाही दिलासा मिळाला आहे.
पावसाळी वातावरणामुळे खोबºयाची मागणी घटली. या दिवसात खोबरे टिकत नाही त्यामुळे खोबरे कमीच प्रमाणात मागविले जाते. गौरी-गणेशोत्सवासाठी मागणी चांगली आहे व भावही नियंत्रणात आहेत.
- सुरेश बरडिया, सुकामेवा-मसाले विक्रेते
गौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढून ती दुप्पट झाली. या काळात जवळपास ५० टन खोबºयाची विक्री झाल्याचा अंदाज आहे.
- अशोक धूत, खोबरे व्यापारी.