साफसफाईसाठी जादा कामगार नियुक्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:43+5:302020-12-03T04:27:43+5:30
मनसेतर्फे शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन जळगाव : महराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ५ डिसेंबर रोजी शहिद सैनिकांना काव्यरत्नावली चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचे ...
मनसेतर्फे शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव : महराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ५ डिसेंबर रोजी शहिद सैनिकांना काव्यरत्नावली चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेेचे जिल्हा सचिव जमिल देशपांडे, सैनिक संघटनेचे विजय सपकाळे, रफीक शेख, रत्नाकर चौधरी, पत्रकार प्रमोद परदेशी यांनी केले आहे.
सै. नियाज अली फाऊंडेशनतर्फे ब्लॅंकेट वाटप
जळगाव : सै. नियाज अली फाऊंडेशनतर्फे हिवाळ्याच्या पार्शभूमीवर शहरातील विविध भागात रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सै. अयाज अली नियाज अली, शफी ठेकेदार, योगेश मराठे, सुरज गुप्ता, इलियास नूरी, अमोल वाणी, अशफाक नूरी, सय्यद उमर, शेख कुरबान आदी समाज बांधव उपस्थित होते.
बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी
जळगाव : शहरातील टॉवर चौकाकडून नेहरू चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर रिक्षांसह बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे वाहनेदेखील उभी असतात. यामुळे पादचारी नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासही जागा राहत नसून, यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपाने बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.
सुमय्या शाह यांचे यश
जळगाव : इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थीम महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुमय्या सलिम शाह हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम. ए. उर्दुच्या अंतिम वर्षांत ९३. ३१ टक्के इतके गुण मिळविले आहेत. या यशाबद्दल सुमय्या यांचे प्राध्यापक कहेकशां शेख व पती रफिक शाह यांनी अभिनंदन केले आहे.