प्राध्यापकांचे मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:30+5:302021-04-29T04:12:30+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-२०२० व मार्च-२०२१ या काळात विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यासाठी प्राध्यापकांकडून प्रश्नसंच ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-२०२० व मार्च-२०२१ या काळात विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यासाठी प्राध्यापकांकडून प्रश्नसंच काढून घेण्यात आले. मात्र, त्यांना मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्या प्राध्यापकांचे मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवारी काँग्रेस पक्षाचे महानगर सचिव ॲड. कुणाल पवार यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विद्यापीठातील कर्मचारी बाधित होत आहेत तर काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला. अशा परिस्थितीत विद्यापीठाने मदतीचा हात दिला नाही. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असताना, विद्यापीठाचा पैसा कुठे जात आहे, असा सवालही त्यांनी निवेदनातून केला आहे. एप्रिल-२०२० व मार्च-२०२१ मध्ये विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या. त्यासाठी प्राध्यापकांकडून प्रश्नसंच तयार करून घेण्यात आले. त्यासाठी विद्यापीठाकडून प्राध्यापकांना मानधन दिले जाणार होते. मात्र, दोन वर्षांचे मानधन प्राध्यापकांना मिळाले नाही. मानधनाच्या रकमेचे विद्यापीठाने काय केले याचा खुलासा करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.