कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:29+5:302021-04-28T04:18:29+5:30
जादा प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई जळगाव : बुधवारी सायंकाळी नेहरू चौकात रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या रिक्षा चालकाने रिक्षात ...
जादा प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई
जळगाव : बुधवारी सायंकाळी नेहरू चौकात रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या रिक्षा चालकाने रिक्षात नियमापेक्षा जास्त प्रवासी बसविल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच यावेळी विनाकारण फिरणाऱ्या वाहन धारकांवरही कारवाई केली. या कारवाईला अनेक वाहन धारकांनी विरोध केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
संचारबंदीमुळे स्वच्छतेवर परिणाम
जळगाव : शहरात सुरू असलेल्या संचार बंदीमुळे शहरातील अनेक भागातील स्वच्छतेवर परिणाम झाला आहे. अनेक भागात गल्ली-बोळीत कचरा आदळून येत आहे. त्यामुळे मनपाने स्वछता मोहीम राबविण्याची मागणी नागरीकां मधून केली जात आहे.
उड्डाणपुलाचे बाहेरील काम रखडले
जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलाचे जिल्हा परिषदेच्या बाजूकडील विद्युत खांब अद्याप हटविण्यात न आल्यामुळे बाहेरील काम रखडले आहे. या मुळे बाहेरील कामाला विलंब होत आहे. तरी महावितरण प्रशासनाने तातडीने विद्युत खांब हटविण्याची मागणी होत आहे.