विकासकामांची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:19 AM2021-08-23T04:19:12+5:302021-08-23T04:19:12+5:30

याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, यावल शहराचा ७० वर्षांत पाहिजे तसा विकास झाला ...

Demand for inquiry into development works | विकासकामांची चौकशी करण्याची मागणी

विकासकामांची चौकशी करण्याची मागणी

Next

याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, यावल शहराचा ७० वर्षांत पाहिजे तसा विकास झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा आपण निषेध करतो. तसेच शहरात झालेल्या विकासकामांची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मागण्यांकडे प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष केले जाते. तसेच शहरातील हिंदू स्मशानभूमीत शौचालय नाही. शहरात तीर्थक्षेत्र श्री तारकेश्वर मंदिराजवळ संरक्षण भिंत नाही, श्री महर्षी व्यास तीर्थक्षेत्राजवळील हरिता, सरिता नदीजवळ घाट नाही तसेच विस्तारित भागांमध्ये पालिकेचे खुले भूखंड हे खासगी विकासकांच्या ताब्यात आहेत. न्यायालयजवळी ऐतिहासिक निंबाळकरांच्या किल्ल्याची दयनीय अवस्था आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे नाही आदी विविध तक्रारी त्यांनी केल्या. स्वातंत्र्यदिनी निषेध फलक लावून त्यांनी पालिका व तहसील कार्यालयाजवळ मूक आंदोलन करीत नागरिकांचे लक्ष वेधले होते.

Web Title: Demand for inquiry into development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.