दिव्यांग कार्डची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:25+5:302021-03-06T04:16:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रार्दुभावामुळे २३ फेब्रुवारीपासून दिव्यांग कार्ड देणे बंद करण्यात आले आहे. मात्र तरीदेखील लॉगिनचा ...

Demand for inquiry of Divyang card | दिव्यांग कार्डची चौकशी करण्याची मागणी

दिव्यांग कार्डची चौकशी करण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रार्दुभावामुळे २३ फेब्रुवारीपासून दिव्यांग कार्ड देणे बंद करण्यात आले आहे. मात्र तरीदेखील लॉगिनचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात दिव्यांग युडीआयडी कार्ड तयार केले जात आहेत. याबाबत प्रहार अपंग क्रांती संस्थेने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून प्रहार अपंग क्रांती संघटनेला मेल प्राप्त झाला आहे. तसेच याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटना, अमळनेर, धुळे व मुक्ताईनगर येथील कार्यकर्त्यांकडे पुरावे प्राप्त झालेले आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच याबाबत पुढील १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशीसह खजिनदार ॲड. कविता पवार, शहराध्यक्ष योगेश पवार, प्रा. जयश्री साळुंके उपस्थित होत्या.

Web Title: Demand for inquiry of Divyang card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.