जळगाव कॉँंग्रेस महिला शहराध्यक्षांचे भिक मांगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:28 AM2019-03-09T11:28:58+5:302019-03-09T11:31:13+5:30
कार्यालयाची जागा भाड्याने
जळगाव : कॉँग्रेस भवन आवारातील जागा भाड्याने दिल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या महिला शहराध्यक्ष अरूणा पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयासमोर एक तास भिक मांगो आंदोलन केले. यातून जमलेले १०८ रूपये पक्षाचे वरिष्ठांकडे सुपूर्द करून तक्रार केली जाईल, असे त्या म्हणाल्या. जागतिक महिला दिनी एका महिला पदाधिकाऱ्यानी पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती.
कॉँग्रेस भवनासमोर पूर्वी दोन कापड विक्रेत्यांची दुकाने होती. मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर ही दुकाने पक्ष कार्यालयाच्या आवारात पार्किंगच्या जागेत हलविण्यात आली आहेत. याला काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. यावरून महिला शहराध्यक्षा अरूणा पाटील यांचा यापूर्वी वादही झाला होता. तसेच या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू होती.
अशा पद्धतीने आंदोलन करण्यापेक्षा अरूणा पाटील यांनी आपली तक्रार करायला पाहीजे होती. वास्तविक आपल्या माहितीनुसार त्या सद्य स्थितीत पदाधिकारीही नाहीत.
- अॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष