पीकपेरा लावण्याची जुनीच पद्धत ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:57+5:302021-08-29T04:18:57+5:30
शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासून कोणताही शेतकरी बांधव वंचित राहता कामा नये, या आशयाचे निवेदन २३ रोजी मारवडसह परिसरातील ...
शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासून कोणताही शेतकरी बांधव वंचित राहता कामा नये, या आशयाचे निवेदन २३ रोजी मारवडसह परिसरातील शेतकरी बांधवांनी तहसीलदार मिलिंद वाघ, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांना देण्यात आले.
या निवेदनात शेतकऱ्यांनी स्वत: शेतातील व्यक्तिगत पीकपेरा लावणे कामी ई-पीकपेरा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही तर असूनही ते ॲप वापरता येत नाही. यातच ज्यँना स्मार्ट फोन वापरता येत असूनही शेतात दिवसभर थांबूनही ई पीकपेरा ॲप हे सदोष बिघाड असल्याने त्यात पीकपेरा लावता येत नाही. अशा सदोष प्रणालीमुळे हे कार्यक्रम कदाचित दीर्घकाळ चालू शकतो. यामुळे यांच्या सदोष प्रणालीमुळे यावर्षी तालुक्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असताना वेळ मारून नेण्याचा हा प्रकार होऊ नये. दुष्काळी अनुदान, पीकविमा हा शेतकरी बांधवाना तत्काळ मिळावा, यासाठी आज तहसीलदार मिलिंद वाघ, प्रांताधिकारी सीमा अहिरे, कृषी अधिकारी भरत वारे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मारवडसह परिसरातील शेतकरी दिलीप पाटील, जयवंतराव पाटील,
उमेश सुर्वे, पंकज पाटील, पांडुरंग पाटील, मधुकर पाटील, दगड़ू पाटील, प्रकाश पाटील, श्यामकांत पाटील,सचिन शिंदे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.