तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:26+5:302021-06-01T04:12:26+5:30

एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प ...

Demand for lifting of moratorium on Taradoot project | तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याची मागणी

तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याची मागणी

Next

एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प आज रखडलेले आहेत म्हणून महाराष्ट्रातील तारादूतांनी आतापर्यंत तीन वेळेस आंदोलन केले आणि सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे तारादूत पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शेतात किंवा घरी बसून उपोषण करण्याचा निर्णय तारादूतांनी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तारादूत घरी बसून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत. गेल्या पंधरा महिन्यांपासून सारथी संस्थेच्या चौकशीमुळे सारथी संस्थेमधील सर्वच प्रकल्प बंद केले आहेत. त्यामुळे तारादूतांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या द्याव्यात अन्यथा कोविड संपल्यानंतर तारादूत आणि मराठा संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपोषणकर्ते तारादूत सुनील देवरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Demand for lifting of moratorium on Taradoot project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.