पहूर येथे एम आयडीसीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:09 PM2019-08-26T16:09:54+5:302019-08-26T16:10:10+5:30
पहूर येथे एम आयडीसीची मागणी
पहूर, ता.जामनेर : परीसरात रोजगार उपलब्ध होण्यासाठी येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी या मागणीचा ठराव पेठ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमुखी मंजूर करण्यात आला आहे.
अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे होते. यादरम्यान विविध शासकीय योजना तसेच पहूरला तालुका दर्जा प्राप्त व्हावा यासह आयत्या वेळी मांडण्यात आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आलीे. रवींद्र पांढरे यांनी पहूर येथील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याद्रुष्टीकोणातून एमआयडीसीबाबत विषय मांडला. यासाठी पाणी पुरवठा उपलब्ध होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे माजी सरंपच प्रदिप लोढा यांनी मत व्यक्त केले.
बॅलेटपेपरसह विविध मागण्या
निवडणूक बॅलेटपेपर पध्दतीने घेण्याची मागणी राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शैलेश पाटील यांनी केली आहे. गुरांना चरण्यासाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणें पावसाळ्यातील आपत्कालीन परीस्थितीवर उपाय योजना, हगणदारी मुक्त गाव, स्वच्छता संदर्भात चर्चा झाली.
अनेकांचे सत्कार
पहूरचे भुमीपुत्र जिल्हा मुद्रांक अधिकारी दिपक पाटील यांनी गावासाठी दाखविलेल्या दात्रुत्वाबद्दल तसेच मुख्यध्यापक पी.टी. पाटील यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान झाल्याने गौरव करण्यात आला. यावेळी सरंपच निता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, अॅड. एस. आर. पाटील, सलीम शेख गणी, संदीप बेढे, शरद पांढरे, रवींद्र मोरे, भारत पाटील, संतोष चिंचोले, सुषमा चव्हाण, ईश्वर बारी, ईश्वर देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.