विद्यापीठातील कर्मचारी वसतीगृहाला माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांचे नाव देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:57+5:302021-03-19T04:15:57+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांचे नाव विद्यापीठातील कर्मचारी वसतीगृहाला देण्यात ...

Demand for naming the university staff hostel after former Vice Chancellor Sudhir Meshram | विद्यापीठातील कर्मचारी वसतीगृहाला माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांचे नाव देण्याची मागणी

विद्यापीठातील कर्मचारी वसतीगृहाला माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांचे नाव देण्याची मागणी

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांचे नाव विद्यापीठातील कर्मचारी वसतीगृहाला देण्यात यावे, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रभारी कुलगुरू ई-वायुनंदन यांचाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांचे १५ मार्चला निधन झाले आहे. प्रा.मेश्राम विद्यापीठाचे कुलगुरू असताना विद्यापीठासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यात विद्यापीठाला अ दर्जा मिळाला आहे. तसेच त्यांच्या कालावधीत विद्यापीठाला मिळालेले विविध पुरस्कार, निधी तसेच विद्यापीठाच्या नावलौकीक वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. विद्यापीठात सामाजिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय प्राचार्य, संचालक, संस्थाचालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असा त्यांचा चाहता वर्ग आहे. सर्व कर्मचारी यांच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करीत आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठातील कर्मचारी भवन गट क्रमांक १५४ व १७६ येथील कर्मचारी निवासस्थानाला प्रा. सुधीर मेश्राम कर्मचारी भवन व एकलव्य आदिवासी सेंटरला प्रा. सुधीरजी मेश्राम एकलव्य आदिवासी सेंटर असे नामकरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for naming the university staff hostel after former Vice Chancellor Sudhir Meshram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.