ठेकेदारांची देयके अदा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:20+5:302021-01-09T04:13:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंधराव्या वित्त आयोगाच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता झालेल्या असताना कामे पूर्ण झाली असतानाही ठेकेदारांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंधराव्या वित्त आयोगाच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता झालेल्या असताना कामे पूर्ण झाली असतानाही ठेकेदारांना देयके दिलेले नाहीत, तरी ही देयके अदा करावी, अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सीईओंकडे पत्राद्वारे केली आहे.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी चार महिन्यांपासून प्राप्त झालेला असून हा निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला वाटप करण्यात आलेला आहे. त्यानुसार विविध स्तरावर या कामांच्या प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश देण्यात आले असून संबधित ठेकेदारांनी विविध कामे पूर्णही केलेली आहे. त्यांची देयके कशा प्रकारे वितरीत करावी, याबाबत निर्णय झालेला नसून सदर देयके संबधित ठेकेदारास अदा करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी लालचंद पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.