मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याच्या मागणीवरून धुळे मनपात सदस्यांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:01 PM2017-10-13T13:01:12+5:302017-10-13T13:02:00+5:30
स्थायी समितीच्या सभेत महिला सदस्यांचा ठिय्या
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 13 - शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर असून या समस्येवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्थायी समितीच्या महिला सदस्यांनी गुरूवारी सभा सुरू असतांनाच सभागृहात ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांनी मोकाट गुरे, कुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी एजन्सी नेमणार असल्याचे जाहीर केल़े
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी झाली़ या सभेला सभापती कैलास चौधरी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होत़े अवघ्या दोन मिनिटातच विषयपत्रिकेवरील तीनही विषय वाचून मंजूर करण्यात आल़े मात्र त्यानंतर सदस्य साबीर सैय्यद यांनी कमी दराने ठेकेदारांकडून निविदा भरल्या जात असल्या तरी कामांचा दर्जा तपासून घ्यायला हवा, असे स्पष्ट केल़े तर सदस्या मायादेवी परदेशी यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे सलग तिस:यांदा लक्ष वेधल़े महापालिकेने मोकाट गुरे, कुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी काय कार्यवाही केली? असा प्रश्न उपस्थित करीत परदेशी यांच्यासह ललिता आघाव, जैबुन्निसा पठाण, यमुनाबाई जाधव, जोत्स्ना पाटील, हजराबी शेख यांनी सभागृहातच ठिय्या मांडला़ अखेर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मोकाट कुत्र्यांना ठार मारणे कायद्याने योग्य नाही, मात्र पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आह़े त्यामुळे मोकाट गुरे, कुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी एजन्सी नेमली जाईल, असे स्पष्ट केल़े सभेला स्थायी समिती सदस्य संजय गुजराथी, ईस्माइल पठाण, साबीर अली सैय्यद, दिपक शेलार, गुलाब महाजन उपस्थित होत़े