साकेगावच्या माठांना राज्यभरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 09:49 PM2020-03-01T21:49:55+5:302020-03-01T21:50:01+5:30

गरिबांचे फ्रिज बाजारात : उन्हाळ्याच्या चाहूलमुळे वाढती गरज

Demand for Sakegaon monasteries statewide | साकेगावच्या माठांना राज्यभरात मागणी

साकेगावच्या माठांना राज्यभरात मागणी

Next


भुसावळ : उन्हाची दाहकता वाढली असून माठातील थंड पाणी पिण्यासाठी सर्वांची पसंती असते ती माठांना. चांगले माठ म्हणून साकेगाच्या माठांना जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभरातही मागणी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच गरिबांचे हे फ्रिज बाजारात आलेले आहेत.
बीडपर्यंत मागणी
जळगावसह औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव, बुलडाणा, चिखली, मलकापूर, उस्मानाबाद अगदी बीडपर्यंत साकेगावचे माठ विक्रीसाठी जातात.
अडीचशे रुपयांपर्यंतचे माठ
१५,२०,व २५ लीटर अशी पाणी क्षमता असलेल्या माठांना अधिक मागणी असते. १५ लीटर पाण्याच्या क्षमतेच्या माठाला १००, २० लीटरला १५०, २५ लीटरला दोनशे ते अडीचशे याप्रमाणे बाजारभाव भेटतो. अर्थात होलसेलसाठी कमी भावात विक्री होते. दरम्यान वडिलोपार्जित व्यवसायाला पूर्वीप्रमाणे भाव मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंब शहरी भागाकडे वळले असून इतर व्यवसायाला पसंती दिली आहे.
असे बनतात माठ
घोड्याची लिद मातीमध्ये मिसळून विशिष्ट प्रकारची माती बनविण्यात येते. भल्या पहाटे तीन वाजता कुंभार बांधव उठतात. बारीक स्वच्छ मातीमध्ये लिदची कालवण केल्यानंतर कच्च्या स्वरूपात माठ घडविले जातात. यानंतर कच्चे माठ मातीच्या दरांमध्ये मजबुतीसाठी ठेवण्यात येतात. भट्टीत भाजल्यानंतर त्यास मजबुती येते. यानंतर चकाकी यावी याकरिता पॉलिश केली जाते.

Web Title: Demand for Sakegaon monasteries statewide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.