जळगावसाठी मुख्यमंत्र्याकडे करणार शंभर कोटीच्या विशेष निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 07:24 PM2018-03-29T19:24:13+5:302018-03-29T19:24:13+5:30

केंद्राच्या अमृत योजनेतंर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शहरात येणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्र्याची भेट घेवून जळगाव शहराच्या विकासासाठी शंभर कोटीच्या विशेष निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

Demand for Special Fund of Rs 100 Crore to Jalgaon Chief Minister | जळगावसाठी मुख्यमंत्र्याकडे करणार शंभर कोटीच्या विशेष निधीची मागणी

जळगावसाठी मुख्यमंत्र्याकडे करणार शंभर कोटीच्या विशेष निधीची मागणी

Next
ठळक मुद्देहुडको कर्जाबाबत करणार चर्चाहुडकोच्या कर्जामुळे शहराचा विकास खुंटलाआर्थिक अडचणीमुळे कर्मचा-यांचे पगार व नगरसेवकांचे मानधन थकीत

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ - केंद्राच्या अमृत योजनेतंर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शहरात येणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्र्याची भेट घेवून जळगाव शहराच्या विकासासाठी शंभर कोटीच्या विशेष निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली. यामागणीसह शहरातील व मनपाच्या प्रलंबित विषयांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिले जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
जळगाव शहर महानगर पालिकेवर हुडको व जेडीसीसी च्या कर्जामुळे मनपाला आपल्या उत्पन्नातुन दर महिन्याला ४ कोटी रुपये व्याजापोटी द्यावे लागत आहे. यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. तसेच हुडकोच्या कर्जामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. मनपा कर्मचाºयांचे गेल्या अनेक महिन्यांपासून पगार नाहीत, मनपा नगरसेवकांचे मानधन थांबविण्यात आले आहे. तसेच मनपाकडे पुरेसा निधी नसल्याने बºयाचशा भागांमध्ये सुविधांची वाणवा असल्याने, नागरिकांची गैररसोय होत आहे. शहरातील समस्या मार्गी लागाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाले. यावेळी स्विकृत नगरसेवक अनंत जोशी उपस्थित होते.

Web Title: Demand for Special Fund of Rs 100 Crore to Jalgaon Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.