जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:20+5:302021-03-21T04:16:20+5:30
तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी जळगाव : शिवाजीनगरच्या बाजूने असलेली तिकीट खिडकी कोरोनामुळे वर्षभरापासून बंद आहे. यामुळे शिवाजीनगरकडून प्रवाशांची ...
तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी
जळगाव : शिवाजीनगरच्या बाजूने असलेली तिकीट खिडकी कोरोनामुळे वर्षभरापासून बंद आहे. यामुळे शिवाजीनगरकडून प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे ही तिकीट खिडकीही सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री
जळगाव : रेल्वे स्टेशन, नवीन बस स्थानक यासह रस्त्यांवर ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व्यावसायिकांकडून उघड्यावरच खाद्य पदार्थ विक्री करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी मनपा आरोग्य विभागाने या व्यावसायायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
महानगरी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये रात्रीचीही गस्त
जळगाव : रेल्वे सुरक्षा बलातर्फे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे गाड्यांमध्ये रात्रीचीही गस्त घालण्यात येत आहे. गाडीमधील प्रवाशांना त्यांच्या सामानाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष श्वान पथकाद्वारे लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणीही करण्यात येत आहे.