विमानतळावर बससेवा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:17+5:302021-06-30T04:11:17+5:30

बसस्थानक ते नेहरू चौकापर्यंत अनेक पथदिवे बंद जळगाव : नवीन बस स्थानकापासून ते नेहरू चौकापर्यंत रस्त्यावरील अनेक ठिकाणचे पथदिवे ...

Demand to start bus service at the airport | विमानतळावर बससेवा सुरू करण्याची मागणी

विमानतळावर बससेवा सुरू करण्याची मागणी

Next

बसस्थानक ते नेहरू चौकापर्यंत अनेक पथदिवे बंद

जळगाव : नवीन बस स्थानकापासून ते नेहरू चौकापर्यंत रस्त्यावरील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्यामुळे, रस्त्यावर अंधार निर्माण होत आहे. यामुळे पादचारी नागरिकांची गैरसोय होत असून, या अंधाराचा फायदा घेत चोरी-लुटमारीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने या मार्गावरील बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

महावितरणच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जळगाव परिमंडळातील ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी व कोरोना उपचाराबाबत कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे कोरोना समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचेही लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

कॉग्रेस सेवादलातर्फे ध्वजारोहन

जळगाव : अखिल भारतीय कॉग्रेस सेवादलातर्फे रविवारी सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांच्याहस्ते गेंदालाल मिल परिसरात ध्वजारोहन करण्यात आले. कॉग्रेस सेवादलातर्फे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ध्वजारोहन करण्यात येते. त्यामुळे या रविवारींही कॉग्रेस सेवादलातर्फे ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे यंग ब्रिगेड महानगर प्रमुख गोकुळ चव्हाण, बाबासाहेब देशमुख, भानुदास गायकवाड, अजित शेख, ज्ञानेश्वर वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजधानी एक्सप्रेसला जनरल बोगी जोडण्याची मागणी

जळगाव : गेल्या वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेेसला `जनरल बोगी` नसल्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे अशक्य होत आहे. ही गाडी संपूर्ण वातानुरकूलीत असल्यामुळे, या गाडीचा तिकीट दर सर्व सामान्य प्रवाशांना परवडनेसा झाला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना परवडेल असा तिकीट दर ठेऊन, या गाड्यांना जनरल बोगी जोडण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

Web Title: Demand to start bus service at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.