शासकीय भरड केंद्र धान्य सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:37+5:302021-05-10T04:16:37+5:30
जळगाव : जिल्ह्यात भरडधान्य केंद्रावर शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नावनोंदणी करून २० दिवसांचा कालावधी उलटूनही हे भरडधान्य केंद्र सुरू झालेले ...
जळगाव : जिल्ह्यात भरडधान्य केंद्रावर शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नावनोंदणी करून २० दिवसांचा कालावधी उलटूनही हे भरडधान्य केंद्र सुरू झालेले नाहीत. त्यामुळे हे केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्या २१ तारखेपर्यंत शासकीय नावनोंदणी झालेली असून त्यात हजारो शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीसाठी नावनोंदणी केलेली असून तरीदेखील शासकीय भरडधान्य खरेदी अद्ययावत सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांच्या घरात धान्य खराब होण्याच्या वाटेवर दिसून येत आहे. या केंद्रावर मका, गहू, ज्वारी हे धान्य खरेदी केले जाते. मात्र, शासकीय खरेदी झाल्यावर सुरू झालेली नाही. ती लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
नीर फाउंडेशनतर्फे लसीकरण नावनोंदणीसाठी मार्गदर्शन
जळगाव : देशभरात सुरू झालेल्या लसीकरण कार्यक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण, लसीकरण केंद्रांना मर्यादित लसींचा पुरवठा शासनाकडून होत आहे. यामुळे बरेच नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी कमी व्हावी व नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता नीर फाउंडेशनतर्फे सोशल मीडियामार्फत जनजागृती आणि मार्गदर्शन मोहीम राबविली जात आहे. नाव नोंदण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेबाबत अडचणींची उत्तरे देण्याचे काम फाउंडेशनचे स्वयंसेवक करीत आहेत. आशिष सोनार यांच्या मार्गदर्शनाने ५ सदस्य परिश्रम घेत आहेत.