शासकीय कार्यालय पूर्णक्षमतेने सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:22+5:302021-08-01T04:17:22+5:30
पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन जळगाव : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी ...
पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन
जळगाव : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी व नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त व बाधितांना मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्तांतर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाइन रोजगार मेळावा
जळगाव : जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे २ ऑगस्टपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची एकूण २०० रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे. या मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळापत्रकात बदल
जळगाव : शिकाऊ उमेदवारांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज करण्याचा ९ ते २७ ऑगस्ट दरम्यान करता येणार असून, परीक्षा २५ ते २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यापूर्वी सर्व शिकाऊ उमेदवारांनी तसेच संबंधित आस्थापनांनी परीक्षेपूर्वीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. पी. पगारे यांनी केले आहे.