हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:27+5:302021-06-28T04:13:27+5:30
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य संदीप कासार यांनी कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून ...
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य संदीप कासार यांनी कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून भुसावळ- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, ही गाडी सुरू करण्यासह, या गाडीची वेळही बदलविण्याची मागणी कासार यांनी या बैठकीत केली. तसेच प्रवाशांना गाड्यांचे आरक्षण मागणीनुसार पूर्ण उपलब्ध होत नाही. परिणामी नाईलाजाने खासगी गाड्यांना जादा पैसे मोजून त्यांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, मुबलक आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी वाजवी दरात पाण्याची बॉटल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.