हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:08+5:302021-06-29T04:13:08+5:30
तसेच प्रवाशांना गाड्यांचे आरक्षण मागणीनुसार पूर्ण उपलब्ध होत नाही. परिणामी नाईलाजाने खासगी गाड्यांना जादा पैसे मोजून त्यांना प्रवास करावा ...
तसेच प्रवाशांना गाड्यांचे आरक्षण मागणीनुसार पूर्ण उपलब्ध होत नाही. परिणामी नाईलाजाने खासगी गाड्यांना जादा पैसे मोजून त्यांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, मुबलक आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी वाजवी दरात पाण्याची बॉटल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
पुढील आठवड्यापासून ग्रामीण बससेवा सुरू करण्यात येणार
जळगाव : जळगाव आगारातर्फे सध्या विविध तालुक्यांना बससेवा नियमित सुरू असून, ग्रामीण भागातल्या सेवा मात्र बंदच आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या जळगाव आगारातर्फे पुढील आठवड्यापासून ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.