पाणपोई सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:51+5:302021-04-18T04:14:51+5:30
दाणा बाजारात लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या दाणा बाजारात दिवसभर अवजड वाहनांची ...
दाणा बाजारात लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी
जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या दाणा बाजारात दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यात दुचाकी व चारचाकी अशा लहान वाहनांचा या बाजारातून वापर सुरू असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाने दाणा बाजारात लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई
जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असतानाही अनेक प्रवासी रूळ ओलांडताना आढळून येत आहेत. अशा प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
महानगरी एक्ऱ्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे, प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये रात्रीचीही गस्ती
जळगाव : रेल्वे सुरक्षा बलातर्फे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे गाड्यांमध्ये रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. गाडीमधील प्रवाशांना त्यांच्या सामानाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष श्वान पथकाद्वारे लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणीही करण्यात येत आहे.