विधी अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:08+5:302021-08-27T04:21:08+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विधी अधिकारी यांची नियुक्ती फक्त्त पाच वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात असल्याने व ...

Demand for termination of service of law officers | विधी अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची मागणी

विधी अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची मागणी

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विधी अधिकारी यांची नियुक्ती फक्त्त पाच वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात असल्याने व सदरचा कालावधी संपून बराचकाळ लोटला असल्यामुळे त्यांची विद्यापीठातील विधी अधिकारी पदावरील सेवा तातडीने समाप्त करावी, अशी मागणी कृतिगट संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

विद्यापीठासाठी कायदा अधिकारी हे पद फक्त तात्पुरत्या स्वरूपात पाच वर्षांसाठी भरण्यात आले होते. पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने जाहिरात प्रकाशित करून पुन्हा या पदासाठी नव्याने मुलाखती घेऊन नेमणूक करणे गरजेचे होते. तथापि, विधी अधिकारी डॉ.भादलीकर यांच्याबाबत तसे काही करण्यात आलेले नाही. त्यांची कुलगुरु निवड शोध प्रक्रिया समितीवर समन्वय अधिकारी नेमणूक करणे चुकीचे आहे, असा आक्षेप कृतिगटाने घेतला आहे.

Web Title: Demand for termination of service of law officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.