जळगावात ट्रॅक्टरची मागणी निम्म्यावर, पावसाच्या लहरीपणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:23 PM2017-10-28T12:23:05+5:302017-10-28T12:45:38+5:30

दसरा-दिवाळीलाही माल हाती न आल्याने बळीराजा अडखळला

Demand of Tractor Half in Jalgaon | जळगावात ट्रॅक्टरची मागणी निम्म्यावर, पावसाच्या लहरीपणाचा फटका

जळगावात ट्रॅक्टरची मागणी निम्म्यावर, पावसाच्या लहरीपणाचा फटका

Next
ठळक मुद्देवरुणराजाची वक्रदृष्टीकापूस काढणीत व्यस्तदिवाळीलाही ‘अवकाळी’चा परिणाम

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  शेती मशागत व कृषी मालाच्या वाहतुकीसाठी शेतक:यांचा जोडीदार असलेल्या ट्रॅक्टरच्या मागणीत यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे निम्म्याने घट आल्याचे चित्र आहे. दरवर्षी दिवाळी-दस:याला असणारी 500 ट्रॅक्टरची विक्री यंदा 250 ट्रॅक्टरवर आली आहे. 
मजुरांचा तुटवडा व बैलजोडीने नांगरटी व इतर मशागतीचे कामे करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ट्रॅक्टरने ही कामे करण्याकडे कल वाढला आहे. सोबतच कृषी मालाची वाहतूकही याद्वारे करता येते. त्यामुळे शेतक:यांकडून हंगाम हाती आला की, ट्रॅक्टरची खरेदी केली जाते. मात्र यंदा हीच खरेदी निम्मावर आली आहे. 

वरुणराजाची वक्रदृष्टी
यंदा पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांना फटका बसला. पावसाच्या दडीने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्यासह पीक हाती येणेही लांबले. त्यामुळे एरव्ही दस:यार्पयत माल घरात येऊन त्याची विक्री झाली की, बळीराजा ट्रॅक्टर खरेदीसाठी उत्सुक असतो. याही वर्षी ही उत्सुकता होती. मात्र पावसाने घात केला व दस:याच्या मुहूर्तावर अनेकजण ट्रॅक्टरची खरेदी करू शकले नाही. त्यामुळे दरवर्षी दस:याला होणारी 500 ट्रॅक्टरची विक्री यंदा 250वर आली. 

दिवाळीलाही ‘अवकाळी’चा परिणाम
पीक काढणे लांबल्याने दस:याला ट्रॅक्टर खरेदी होऊ शकली नाही म्हणून ही खरेदी दिवाळीला वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळीही दस:यासारखीच गेली. शेतात पीक उभे असताना ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने पिकांचे नुकसान झाले व मालही काढता आला नाही. त्यामुळे दिवाळीमध्येही हाती पैसा नसल्याने खरेदीही होऊ शकली नाही व दिवाळीमध्येही हा आकडा 500 वरून 250वर आला.  

कापूस काढणीत व्यस्त
दिवाळीच्या पूर्वी काही दिवस हाती असले तरी या काळात शेतक:यांनी खरेदीपेक्षा माल काढण्याकडे अधिक लक्ष दिले. यामध्ये कापूस काढणीत बळीराजा व्यस्त राहिला. कापूस उत्पादक शेतकरी काढणी व्यस्त राहिला तरी  दुसरीकडे यावल, रावेर, चोपडा या केळी पट्टय़ातील शेतक:यांना ट्रॅक्टर खरेदी करता आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
शहरात काही नवीन कंपन्यांचे ट्रॅक्टर शो रुम सुरू झाल्याने त्यांनी ‘मार्केटिंग’ जोरात सुरू केले आहे. त्यांचे क्षेत्र वाढत असल्याने यंदा त्यांच्या आकडेवारीत वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र एकूण बाजारपेठेचा विचार केला तर मागणी निम्म्यावर आली आहे.

यंदा पावसाचा परिणाम होऊन दसरा व दिवाळीला माल हाती न आल्याने शेतकरी त्यांची विक्रीही करू शकले नाही. हातात पैसा नसल्याने त्यांना ट्रॅक्टर खरेदी करता आली नाही. परिणामी ट्रॅक्टरची मागणी घटली. मात्र नवीन कंपन्यांच्या शोरुममध्ये ट्रॅक्टरची विक्री वाढली. 
- ए.बी. पिंजारी, व्यवस्थापक, पंकज ऑटोमोबाईल्स. 

Web Title: Demand of Tractor Half in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.