मुर्दापूर धरणातून शेतीस पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:28 AM2020-12-03T04:28:07+5:302020-12-03T04:28:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद- येथून जवळच असलेल्या मुर्दापूर लघू पाटबंधारे धरणातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ज्वारी हरभरा पिकांना ...

Demand for water for agriculture from Murdapur dam | मुर्दापूर धरणातून शेतीस पाणी देण्याची मागणी

मुर्दापूर धरणातून शेतीस पाणी देण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नशिराबाद- येथून जवळच असलेल्या मुर्दापूर लघू पाटबंधारे धरणातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ज्वारी हरभरा पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी आशयाची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली असून त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.

यंदा मुबलक मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरण साठा शंभर टक्के भरला असून ओसंडून वाहत होता धरण लाभक्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांना या धरण साठ्यातून आवर्तन पाण्याचे सोडण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नशिराबाद परिसरात असलेला मुर्दापूर लघु प्रकल्प यंदा शंभर टक्के भरलेला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन कैफियत मांडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी व पेरणी केलेल्या पिकांची स्थिती उत्तम होऊन उत्पनात वाढ होण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे

Web Title: Demand for water for agriculture from Murdapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.