लोकशाही दिनाचे 1 फेब्रुवारी रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:31 PM2021-01-28T18:31:22+5:302021-01-28T18:31:33+5:30

जळगाव  - नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत ...

Democracy Day organized by Television Council on 1st February | लोकशाही दिनाचे 1 फेब्रुवारी रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन

लोकशाही दिनाचे 1 फेब्रुवारी रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन

Next
ठळक मुद्देतहसील कार्यालयात उपस्थित राहून मांडता येणार तक्रारी

जळगाव - नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दुरचित्रवाणी परिषदेव्दारे करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता दिनांक 1 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11 वाजता दुरचित्रवाणी परिषदेव्दारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Web Title: Democracy Day organized by Television Council on 1st February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.