पारोळा येथे शेतकºयांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:46 PM2018-06-11T18:46:57+5:302018-06-11T18:46:57+5:30

पीककर्ज मिळण्यात अडचणी : सातबाराच्या उताऱ्यावर बोझा बसवून मिळावा

Demolition of Farmers at Parola | पारोळा येथे शेतकºयांचा मूकमोर्चा

पारोळा येथे शेतकºयांचा मूकमोर्चा

googlenewsNext


पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील शेतकरी पीककर्जासाठी तलाठ्याकडे बोझा बसविण्याकरीता फिरत असून, नेटवर्क सर्व्हर हे नेहमी बंद असल्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकºयांना सातबारावर बोझा बसवून मिळावा यासाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी तहसील व पोलीस प्रशासनास निवेदन दिले.
तालुक्यातील शेतकºयांनी सोमवारी दुपारी एकला विश्रामगृहात बैठक घेतली. आचारसंहिता लागू असल्याने शांततेच्या मार्गाने तहसील कार्यालयात मूकमोर्चा काढला. नायब तहसीलदार एन.झेड.वंजारी व हे.कॉ.प्रताप पाटील, फिरोज बागवान यांना निवेदन देण्यात आले.
कुठलीही कार्यवाही न झाल्यास, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काळू पाटील यांनी सांगितले.
याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की, पारोळा तालुक्यातील शेतकरी पीक कर्जासाठी वणवण फिरत आहेत. सर्वर डाऊन झाल्यामुळे सातबारा उताºयावर तलाठी बोजा बसवून देत नाहीत. बोजा न बसविल्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज मिळत नाही. यासंबंधी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त व मंत्रालयातील सचिव व मंत्री जबाबदार असून, जून महिना आला तरी शेतकºयांना पीक कर्जापासून शासन वंचित ठेऊ इच्छित आहे. आपण ताबडतोब सर्व्हरबाबत शासनाकडे पाठपुरावठा करून त्वरित उताºयावर बोजा बसविण्याची प्रक्रिया सुरू करावी.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पारोळा तालुकाध्यक्ष काळू रामदास पाटील, दगडी सबगव्हाण विकासो चेअरमन सुभाष बाबूलाल पाटील, सीताराम हरी पाटील (कंकराज), वसंत रामभाऊ पाटील, विजय पाटील, अर्जुन पाटील, ताराचंद वंजारी, गणेश पाटील, अनिल पाटील, प्रताप पाटील, संजय सोनार, आत्माराम मराठे, नगराज पाटील, भगवान सोनार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Demolition of Farmers at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.