सीआरएमएसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:52 PM2020-10-20T22:52:01+5:302020-10-20T22:52:07+5:30
विविध मागण्या : केंद्र सरकारच्या धोरणांचा केला निषेध
भुसावळ : एनएफआयआरच्या आवाहनानुसार, भुसावळ इलेक्ट्रिकल रेल्वे इंजीन कारखान्यात मंगळवारी २० रोजी सामाजिक अंतर पाळत झोनल वर्कशॉप सेक्रेटरी पी. एन. नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व शाखा अध्यक्ष किशोर कोलते यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात निदर्शने करीत निषेध नोंदविला गेला.
सदर आंदोलन यशस्वीतेसाठी डी. यू. इंगळे, अजित अमोदकर, हरिचंद सरोदे, दीपक खराटे, विकास सोनवणे, स्वप्निल पाटील, सुरेंद्र गांधी, राजेश सोनी, संदेश इंगळे, सचिन खडवे, गिरीश फालक, ताराचंद बारहाते, चेतन सननसे, तुकाराम पाटील, कुणाल बोंडे, विजय झोपे, किशोर नेहते, जितेंद्र मानकर, रूपेश धांडे, अल्ताफ खान, ललित पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अशा आहेत मागण्या....
रेल्वे कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर करा, काही महिन्यांपासून डीए जे थांबवले आहे ते पुन्हा द्या, जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगीकरण थांबवा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने केली.