भुसावळ येथे सीआरएमएसतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 03:22 PM2019-09-29T15:22:02+5:302019-09-29T15:23:19+5:30
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाद्वारे गेल्या तीन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेचे परेल वर्कशाप बंद करून त्या ठिकाणी टर्मिनस बनविण्याच्या तुघलकी फर्मानाविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाद्वारे (सीआरएमएस) गेल्या तीन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, परेल वर्कशाप लवकरात लवकर बंद करुन तेथील कामगारांना इतरत्र स्थानांतरण करण्याचे कटकारस्थान केंद्र सरकारद्वारे रचण्यात येत आहे. अलिकडेच ७१५ कामगारांना बडनेरा या ठिकाणी स्थानांतरण करण्याचे आदेश पत्र काढण्यात आलेत.
या संपूर्ण प्रकाराविरोधात भुसावळ येथे सीआरएमएसच्या पीओएच शाखेद्वारे मागील तीन दिवसांपासून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात येत आहेत.
सीआरएमएसद्वारे सर्वत्र होत असलेल्या निदर्शनांची दखल घेत भारत सरकारने एका पत्राद्वारे नेशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमेन्सच्या पदाधिकाऱ्यांना या विषयावर चर्चा करण्याकरिता आमंत्रित केले आहे.
सीआरएमएस पीओएच शाखेद्वारे करण्यात येत असलेल्या निदर्शनात मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधिया, झोनल सचिव पी.एन. नारखेडे, मंडल सचिव एस. बी.पाटील, शाखा सचिव डी.यु.इंगळे, मंडल सहसचिव ईश्वर बाविस्कर, अजित अमोदकर, विकास सोनवणे, सुरेंद्र गांधेले, हरिचंद सरोदे, पी.के.जोशी, व्ही.एम.नेमाडे, फारुख खान, संदेश इंगळे, चंद्रकांत चौधरी, संदीप येवले, ताराचंद, प्रमोद बाविस्कर, प्रशांत कमलजा यांच्यासह पीओएच शाखेचे पदाधिकारी तसेच कामगारांनी आपला विरोध नोंदवला, अशी माहिती सीआरएमएसचे मीडिया सेल सचिव मेघराज तल्लारे यांनी दिली.