भुसावळात संरक्षण कामगारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:56 PM2020-09-23T14:56:31+5:302020-09-23T14:57:50+5:30

अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघ यांच्यावतीने बुधवारी सकाळी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगारांनी निदर्शने केली.

Demonstrations by defense workers in Bhusawal | भुसावळात संरक्षण कामगारांची निदर्शने

भुसावळात संरक्षण कामगारांची निदर्शने

Next

भुसावळ : अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघ यांच्यावतीने बुधवारी सकाळी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगारांनी निदर्शने केली.
आॅर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बुधवारी सकाळी कामावर जाते वेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात प्रचंड घोषणा देत विरोध प्रदर्शन केले.
अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघाचे आदेशानुसार देशातील सर्व संरक्षण क्षेत्रात तसेच देशातील ४१ आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगार आपल्या युनिटमध्ये सरकारच्या कर्मचारी विरोधी नीतीचा विरोध केला. सर्व कर्मचारी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर जमा झाले. लाल, निळे झेंडे घेत घोषणाबाजी करीत सरकारचा विरोध केला. आॅर्डनन्स फॅक्टरीचे निगमिकरण निर्णय रद्द करणे, एफडीआयचा विरोध, संरक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया सुरू करणे, रिक्त पदे मंजूर करणे, कामगार कायद्यात बदलाचा विरोध, नवी पेन्शन रद्द करणे यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी १ दिवसीय विरोध प्रदर्शन केले.
किशोर बढे, दीपक भिडे, दिनेश राजगिरे यांनी सरकारचे कामगार विरोधी धोरण स्पष्ट केले. उपक्रम यशस्वीतेसाठी किशोर पाटील, मिलिंद ठोंबरे, नाना जैन, ज्ञानदेव सरोदे, राजू तडवी, संतोष बाविस्कर यांच्यासह युनियन पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. युनियनच्या वतीने महासंघाचे उपाध्यक्ष कॉ.राजेंद्र झा व दिनेश राजगिरे स्टाफ साईड जेसीएम सदस्य (तृतीय) आयुध निर्माणी बोर्ड कोलकाता यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
 

Web Title: Demonstrations by defense workers in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.