शिक्षकांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 09:33 PM2019-08-27T21:33:10+5:302019-08-27T21:33:21+5:30
जळगाव : गेल्या १५ वषार्पासून विना अनुदान तत्वावर व वाढीव तुकड्यांवर काम करणाऱ्या उपोषणकर्त्या शिक्षकांना मुंबई येथील आझाद मैदानावर ...
जळगाव : गेल्या १५ वषार्पासून विना अनुदान तत्वावर व वाढीव तुकड्यांवर काम करणाऱ्या उपोषणकर्त्या शिक्षकांना मुंबई येथील आझाद मैदानावर पोलीसांकडून अमानुष लाठीमार करणाºया सरकारचा जिल्ह्यातील शिक्षकांतर्फे अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला.
धरणगाव : येथे तालुका माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, टीडीएफ व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांतर्फे तीव्र निषेध केला. काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. तहसीलदार मिलींद कुलथे यांना निवेदन देण्यात आले.
मुख्याध्यापक संघाचे प्रा.बी.एन.चौधरी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी.के.पाटील, टीडीएफचे जिल्हा कौन्सिल सदस्य शरदकुमार बन्सी, टीडीएफ अध्यक्ष डी.एस.पाटील, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील, टीडीएफचे उपाध्यक्ष पी.डी.पाटील, पी.आर.चे आर.के.सपकाळे, डॉ.वैशाली गालापूरे, वंदना डहाळे, सुरेखा तावडे, कैलास वाघ, एन.आर.सपकाळे, इंदिरा गाधी विद्यालयाचे डी.एन.पाटील, राजेंद्र पाटील, सुनिल कोळी, एस.व्ही.आढावे, हेमंत माळी, चंद्रकांत भोळे, आदर्श विद्यालयाचे किरण चव्हाण, अँग्लो उर्दूचे शकील शेख, एस.पी.सोनार, एस.के.बेलदार, जी.आर.सृर्यवंशी, आर.जी.खैरे, योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून मंगळवारी निषेध केला.
पारोळा : येथे जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकारी, सदस्य व सभासदांनी निषेध केला.
अमळनेर : तालुक्यातील मुख्याध्यापक संघ, टी.डी.एफ.शिक्षक भारती, क्रीडा, कलाध्यापक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेकडून काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन तुषार पाटील, एम.ए.पाटील, संजय पाटील, सुशिल भदाणे, आर.जे.पाटील, सचिन सांळुखे, सुनील वाघ, हर्षल पाटील आदींनी केले.