गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्युचे रुग्ण घटताय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:16 AM2021-05-16T04:16:10+5:302021-05-16T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटात डेंग्यू रुग्णांची संख्याच नव्हे तर तपासण्यांवरही मर्यादा आल्याचे चित्र असून गेल्या चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या संकटात डेंग्यू रुग्णांची संख्याच नव्हे तर तपासण्यांवरही मर्यादा आल्याचे चित्र असून गेल्या चार महिन्यांच्या काळात केवळ १२ रक्तनमुने तपासण्यात आले असून यात पाच डेंग्यूचे रूग्ण समोर आले आहेत. गेल्या वर्षी ११६ डेंग्यूंच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, डेंग्यू व कोरोनाची लक्षणे जवळपास सारखी असल्याने ही लक्षणे संभ्रमात टाकणारी असल्याने कोरेाना चाचणी करुून ते निदान करून घ्यावे, आणि पुढील धोके टाळावे असे तज्ञ सांगतात
१६ मे रोजी सर्वत्र डेंग्र्यू दिवस पाळला जात असल्याने जिल्हा हिवताप विीागाने याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत माहिती दिली. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून तो एडीस इजिप्ती या डासाच्या चाव्याने होतो. डास चावल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवसानंतर मनुष्याला या आजाराची लागण होते. यात दोन प्रकार आहेत. एक डेंग्यू ताप आणि दुसरा रक्तस्त्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा तीव्र स्वरूपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतेा, त्यामुळे डासांची उत्पती होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतल्यास, प्रशासनाच्या आवाहनाल प्रतिसाद दिल्यास डेंग्यू टाळता येतो, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातून २८१ तर शहरी भागातून ४४ रक्तनमुने संकलीत करण्यात आली होती. त्यापैकी ग्रामीणमध्ये ११६ तर शहरी भागात १९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले हेाते. तर या वर्षी एप्रिल अखेर पर्यंत शहरी भागातून केवळ १ तर ग्रामीण भागातून ११ नमूने संकलीत करण्यात आले. यात केवळ ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळूले आहेत.
अशी आहेत लक्षणे
एकदम जोराचा ताप
डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
डोक्याच्या मागील भागात वेदना जी डोळ्र्यांच्या हालचालींसोबत अधिक दुखते
चव आणि भूक नष्ट होणे
त्वचेवर व्रण उठणे
रक्तस्त्रावात्मक ताप
तीव्र व सतत पोटदुखी
त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे
नाक, तोंड, आणि हिरड्यांतून रक्त येणे, त्वचेवर पुरळ उठणे,
रक्तासह किंवा रक्ताविणा वारंवार उलट्या होणे
तहान लागते व तोंड कोरडे पडणे
नाडी कमकुवतपणे जलद चालते
श्वास घेताना त्रास होतोे