खेडगावी डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 20:22 IST2021-04-17T20:21:59+5:302021-04-17T20:22:34+5:30
मेडीकल व्यावसायिक सुनील भावराव पाटील (३५) यांचा दि. १७ रोजी डेंग्युमुळे मृत्यू झाला.

खेडगावी डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
खेडगाव, ता. भडगाव : येथील मेडीकल व्यावसायिक सुनील भावराव पाटील (३५) यांचा दि. १७ रोजी डेंग्युमुळे मृत्यू झाला. गावातील सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग घेणाऱ्या तरुणाच्या मृत्यूमुळे गावी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बंधू, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
खेडगावी मागील महिनाभरापासून डेग्यूंची साथ सुरु आहे. खाजगी दवाखान्यात जवळजवळ १५-२० जणांवर उपचार सुरु आहेत. सुनील माळी यांचे काही दिवसापूर्वी डेंग्यूचे निदान झाले होते. धुळे येथे खाजगी दवाखान्यात त्यांचेवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकूती खालावल्याने त्यांना आज नाशिक येथे हलविण्यात आले असता त्यांचा मृत्यू ओढवला. कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी मागील दिड-दोन वर्ष आपले मेडीकल दुकान उघडे ठेवत ग्रामस्थांना रात्रंदिवस सेवा दिली होती.
खेडगावातील डेंग्यूच्या साथीसंदर्भात गावातून गुढे आरोग्य केंद्राचे पथक फिरुन त्यांनी तीनजणांचे रक्त अहवाल रक्त तपासणीसाठी पाठविले आहे. प्रतिबंधक उपाय सुरु आहे. गावी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. ग्रा. प.ला सील असल्याने डेंग्युसाठी गावातून फवारणी आदी उपाययोजनेसाठी अडचण होती. तहसिलदारांना कळवीत सील उघडण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. ग्रा. पं.ला डासप्रतिबंधकाची फवारणीविषयी सुचित केले आहे.
-नितीन सोनवणे, वैद्यकिय अधिकारी ,गुढे आरोग्य केंद्र