मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे डेंग्यूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:56 PM2018-11-11T21:56:22+5:302018-11-11T21:57:35+5:30

हरताळे येथे दोघा १० वर्षीय मुलांना डेंग्यूची लागण झाल्याने एक जळगाव येथील खासगी दवाखान्यात, तर दुसरा मुक्ताईनगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.

Dengue scarcity in Hattalale in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे डेंग्यूचे थैमान

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे डेंग्यूचे थैमान

googlenewsNext
ठळक मुद्देदोघा १० वर्षीय मुलांंना लागणआरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज

हरताळे, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव : हरताळे येथे दोघा १० वर्षीय मुलांना डेंग्यूची लागण झाल्याने एक जळगाव येथील खासगी दवाखान्यात, तर दुसरा मुक्ताईनगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.
एकाचे दोन रूग्ण वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात शाळा व ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान राबविले होते. तरीदेखील डेंग्यूने डंख मारलाच. गेल्या आठवड्यात दुसरा रूग्ण आहे. डेंग्यूची लागण पसरू नये त्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक शाखा अध्यक्ष शेख यासिन शेख मुसा यांनी केली आहे. गेल्या महिन्यात जन जागृती केली तरीदेखील सर्वांनी वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आह,े अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गावातील प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करावे. कोरडा दिवस पाळावा यासाठी उपाययोजना करावी. शासकीय रुग्णालयात उपचार न घेता खासगी रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. पुन्हा स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


 

Web Title: Dengue scarcity in Hattalale in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य