'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो

By Ajay.patil | Published: August 29, 2022 07:29 PM2022-08-29T19:29:36+5:302022-08-29T19:30:49+5:30

स्त्रीरोग तज्ज्ञांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेध

Denial of 'that' statement; Shiv Sena burnt Gulabrao Patal's photo | 'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो

'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो

Next

अजय पाटील 
जळगाव - राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ व महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, सोमवारी शिवसेना महानगरच्यावतीने गुलाबराव पाटील यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. तसेच गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली.

महापालिकेसमोर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी,समन्वयक अंकुश कोळी,उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, जीलाणी शेख, शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी,नीलू इंगळे, निता सांगोले, मनीषा पाटील, विमल वाणी, गायत्री सोनवणे, शिला रगरे, अन्नपूर्णा बनसोडे, प्रमिला बारी, अल्पसंख्यांक आघाडीचे झाकीर पठाण, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी,  पुनम राजपूत, अमित जगताप, जय मेहेता, अभिजित रंधे, अमोल मोरे, महेश ठाकूर, श्रीकांत आगळे, अंकुश कोळी, फरीद खान, ईश्वर राजपुत, किरण भावसार, उमेश चौधरी, प्रीतम शिंदे मोहसीन पिंजारी मोहसीन शेख आदी उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी ‘महिला डॉक्टरांचं अपमान करणाऱ्या गुलाबराव पाटलांचे करायचं काय, खालती डोके वरती पाय", ‘पन्नास खोके रिकामे डोके", "५० खोके खोके, माजले बोके’ अशाप्रकारच्या विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच गुलाबराव पाटील यांनी त्वरीत माफी मागावी अशीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.

Web Title: Denial of 'that' statement; Shiv Sena burnt Gulabrao Patal's photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.