दंतोपचाराची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:22+5:302021-01-03T04:17:22+5:30

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचाराची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. तोंडाच्या कर्करोगावरदेखील उपचार होणार असून ...

Dental facilities | दंतोपचाराची सुविधा

दंतोपचाराची सुविधा

Next

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचाराची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. तोंडाच्या कर्करोगावरदेखील उपचार होणार असून दंतरुग्णांनी ओपीडीकाळात लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कक्ष क्र. २१४ मध्ये ओपीडीकाळात सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान सरकारी माफक दरात दंतोपचार सुरू झाले आहे.

फोटो आहे..२ सीटीआर २४

टपाल विभागाची मोहीम

जळगाव : शहरातील मुख्य डाकघर पांडे चौक, जळगाव व चाळीसगाव मुख्य डाकघर येथे ४ ते १४ जानेवारी या कालावधीत बचत खाते उघडणे, विशेष सुकन्या, आधार एनरोलमेंट व अद्ययावत करणे, जीवन विमा, आयपीपीबी खाते उघडणे, प्रधानमंत्री ई-योजना आदींबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जळगाव विभागाचे अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे यांनी सांगितले.

४ रोजी लोकशाही दिन

जळगाव : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दरमहिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

त्यानुसार, जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वसुंधरा अभियानाची शपथ

जळगाव : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणरक्षणाच्या अनुषंगाने ‘हरित शपथ’ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, अमित भोईटे उपस्थित होते.

फोटो आहे... २ सीटीआर २३

नोंदणी बंधनकारक

जळगाव : जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान नियम, २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्र यांना संस्थेची नोंदणी महाराष्ट्र प्राणिकल्याण मंडळाकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, नोंदणी न करता पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

संबंधितांनी आपली नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्राणिक्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी दिले आहेत. केंद्र नोंदणीशिवाय अवैध ठरतात. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कर्मचाऱ्यांनी केली पेंटिंग

जळगाव : दिवसभर रुग्णसेवेत असणारे हात गुरुवारी काही काळ विसावले... अन् हातात चक्क ब्रश घेऊन त्यांनी भित्तीचित्रांवर रंगकाम करीत स्वतःच्या कलेला आणि प्रतिभेला वाट मोकळी करून दिली. स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे यांच्यासह अनिल बागलाणे, प्रकाश सपकाळ, राजेंद्र करोसिया, दिनेश कंडारे, प्रमोद कोळी, राहुल सपकाळ यांचा समावेश होता.

फोटो आहे..

Web Title: Dental facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.